हे छायाचित्रण माझे नाही

छायाचित्रणाची वा त्याच्या आस्वादाची आवड असणाऱ्यांना त्यांची नसलेली, पण मायाजाळावर इतरत्र उपलब्द्ध असलेली, मुख्यत्वेकरून मराठी माती, मराठी माणसं, मराठी मती, मराठी मानसं या मनोगताच्या मूळ गाभ्याला धरून असणारी वा इतर संलग्न विषयांवरील (महाराष्ट्र, भारत, संस्कृती, समाज...)छायाचित्रांचा दुवा देण्यासाठी ही चौकट.


याचा वापर कसा कराल..


- मनोगतावरील वावरा/लेखनाबाबतचे सभ्यतेचे/मर्यादेचे निकष इथेही लागू आहेत.
- प्रत्येक नवा प्रतिसाद हा नव्या छायाचित्रांचा समूह असेल. ज्या-त्या छायाचित्रांविषयीचे अभिप्राय त्या-त्या उपप्रतिसादात.
- शक्य तिथे मूळ छायाचित्रकाराचे नाव व छायाचित्राबद्दलची माहिती द्यावी.


तर कुठल्याही शुभकार्याप्रमाणे याचा ही श्रीगणेशा. 



गणेश, छायाचित्रकार- मयुरेश, सौजन्य- फ्लिकर