यादी

गोड हास्याच्या सुरीचा घाव आहे
जीवघेणा प्रीतिचा हा डाव आहे

बोलण्याने लाघवी घायाळ केले
सोडला ना काळजाने ठाव आहे


तूच होता मारला ना काल डोळा
आज नेत्रीं लाजरा का भाव आहे



चोरटी ती खुण का केलीस तेंव्हा
लोटला भेटीस सारा गाव आहे


धीर केला हात हाती घेतला मी
अंतरी सामावण्याची हाव आहे



जीवनी आहे तुझ्या का स्थान काही
कोणत्या यादीत माझे नाव आहे ?