आभास

गर्व का मानवी नकाशाचा?

कागदी रेष मान देशाचा?


ये जरा झोपड्या नव्या बांधू

भार हलका करू महालांचा


वेळ टळली जरी पहाटेची

फक्त आभास का प्रकाशाचा?


सूट-बूटात पाहतो बुद्धी

आब आहे जगात वेषाचा


का फुलांनी असे सुगंधावे

स्पर्श होता जरा वसंताचा


ही खुमारी नवी, नवी लाली

छंद जडला नवा उसाशांचा


ओळखू लागलो सखे आता

हुंदका नाटकी उमाळ्याचा


आठवावी तरी किती नावं

चेहरा एकसा विमोहाचा


शब्द नेता, मिलिंद, बाजारा

भाव चढला कसा दलालांचा