पिलू आणि लिलू !

चिव चिव चिमणी
गाते गाणी
बांधले घरटे
झाले उलटे
पडले पिलू
पाहाते लिलू
लिलूने बोट लावले
पिलूने बोट चावले
लिलू लागली रडायला
आई समजूत घालायला
लाडू दिला खायला
लिलू लागली हसायला !

- अनामिका.

हे बालगीत साभिनय म्हटल्यास लहान मुलांना खूप आवडतं, असा अनुभव आहे. मुलं गाण्यात गुंगून जातात आणि लिलूपिलूच्या जगात जाऊन पोहोचतात. लिलू रडतेय म्हटलं की त्यांचेही चेहरे रडवेले होतात आणि शेवटी ती हसतेय कळलं की त्यांनाही आनंद होऊन ते खदखदून हसतात. खूपच मनमोहक अनुभव असतो हा. असंच एकदा गाणं म्हणून दाखवल्यावर "लिलूला लादू मिलाला.. तू कदी देनाल मला लादू?" असाही प्रश्न उपटला होता तेव्हा हसताहसता पुरेवाट झाली माझी आणि पोळीचा लाडू बनवून देऊन ( भुकेल्या ) भाचेराजांची मर्जी राखण्यात यश मिळवलं होतं !!! :))