मराठी गाण्यांच्या भेंड्या भाग ६

नमस्कार मंडळी,
     ह्या पानावर मराठी गाण्यांच्या भेंड्या पुढे चालू ठेवूया. पण त्यासाठी काही सोपे नियम आहेत. त्यांचे पालन केल्यास भेंड्या जास्तीत जास्त सुरळीत चालू राहतील.



  • नवीन गाणे नवीन प्रतिसादात लिहावे, उपप्रतिसाद देऊ नये.
  • गाण्याची पहिली ओळ प्रतिसादाच्या शीर्षकात चिकटवावी, म्हणजे नंतर वाचणाऱ्यांना प्रत्येक प्रतिसाद उघडून वाचावा लागत नाही.
  • देव-देवतांच्या आरत्या चालतील. 
  • आधीच्या गाण्यांची पुनरावृत्ती नको.
  • इथे गाणे टंकल्यावर पुन्हा एकदा तपासण्यासाठी नवीन पान उघडते. तेंव्हा आपल्या प्रतिसादाखाली मूळ लेखाचा सुरुवातीचा भाग असतो, तेथे एकूण प्रतिसादांची संख्या दिलेली असते. व बाजूला एखादा नवीन प्रतिसाद तेवढ्यात कुणी टाकला असेल तर तसेही लिहिलेले असते. तेंव्हा प्रतिसाद सुपूर्त करण्याआधी त्यावर एक नजर टाकणे सोपे जाईल. एक नवा प्रतिसाद अशा शब्दांवर उजवी टिचकी मारून दुसऱ्या पानावर उघडलेत, तर तो नवीन प्रतिसाद तर वाचता येईलच व त्याचप्रमाणे आपल्या प्रतिसादात फेरफारही करता येईल.
  • एकाच वेळेस अनेक प्रतिसाद आले तर पुढच्या प्रतिसादात कोणते अक्षर ग्राह्य धरून गाणे लिहिले आहे ते पाहावे. ते अक्षर ज्या प्रतिसादात शेवटचे अक्षर असेल त्या प्रतिसादातले गाणे सोडून इतर गाणी परत वापरता येतील.
  • आधीचे भाग -

  • भाग ५ मध्ये शेवटचे गाणे होते...




जेथे जातो तेथे तू माझा सांगाती


अक्षर ''