सँडविच

  • पावाचे स्लाइस १२
  • बटर किंवा साजुक तूप
  • मटारचे दाणे २ वाट्या, बटाटा १ मध्यम,
  • कांदा अर्धा, टोमॅटो १, बारीक चिरलेला कोबी १ वाटी,
  • बारीक चिरलेली सिमला मिरची १ वाटी, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
  • लसुण पाकळ्या ७-८, हिरव्यागार तिखट मिरच्या ५-६
३० मिनिटे
२ जणांना भरपूर

मटारचे दाणे व बटाटा उकडून घ्यावेत. नंतर रोवळीमधे ठेवावेत, म्हणजे त्यातील पाणी निथळून जाईल.

नंतर कुस्करलेला बटाटा, कुस्करलेले मटारचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, लसुण, हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, सिमला मिरची व कोथिंबीर हे सर्व चमच्याने एकत्रित करुन घेणे. चवीप्रमाणे मीठ घालणे. परत एकदा मिश्रण एकत्रित करणे.

नंतर एका स्लाइसवर तयार केलेले भाज्यांचे मिश्रण पसरणे (जाड थर) व एका स्लाइसवर बटर किंवा साजुक तूप  पसरणे. हे दोन्ही स्लाइस एकमेकांवर ठेवुन  ब्रेड टोस्टर मधे भाजून घेणे. व गरम गरम खाणे.

रोहिणी

नाहीत.

स्वानुभव