अदभुत रम्य कथेचे दालन.

मराठी भाषेतील दालनात अद्भुतरम्य कथांचे एक आगळे आणि वेगळे असे अस्तित्व आणि महत्व ठरलेले आहे. हे दालन ह. ना. आपटे, गों.ना.दातार, नाथमाधव  आणि शशी भागवत याच्यां सारख्या प्रतिभासपंन्न सारस्वतानी मनापासुन सजविलेले आहे.


अद्भुतरम्य कथांचे हे दालन मधासारखे अविट आहे. अविट, मधुर, गोड-गोड आणि हवेहवेसे वाटणारे. प्रसंगी औषध म्हणुन वापरतायेण्यायोग्य. या कथांचे अनेकाविध वैशिष्टे मराठी वाचकांना नेहमीच भुरळ टाकत आलेले आहे. 


१. भाषेचा डौल आणि संस्कृत भाषेचा हवाहवासा प्रभाव. 


२. कथा-कथानके- उपकथानके यांची अप्रतिम मांडणी.


३. भुयारे, दुर्ग, शस्त्रे, अस्त्रे, वीर, योध्दे , सन्यासी, दास- दासी आणि प्रितीकथा यांचा संगम. लहानमुलांपासुन ते वयोवृध्दांना सुध्दा आवडनारे कथानक.


४. मनोरजंनापासुन ज्ञानोपदेश करनारे प्रभावी माध्यम.


५. गुतांगूती चे आणि मन खिळवुन ठेवनारे प्रभावी कथानक.


६. इतिहास, समाज, वीरपुरुष, सस्कृती, अध्यात्म, लेखन आणि वाचन या वर प्रेम असणारया लोकांच्या विचारांना दिशा देण्याचे सामर्थ्य असलेली लेखनशैली. 


७. देव, धर्म आणि देश यासारखे विषय सुध्दा अतिशय रम्य, गम्य आणि ज्ञेय गतीने सागंणारी पध्दत.


८. प्रथम ओळी पासुन ते उपसंहारापर्यन्त मनाला कोणताही शीण न देता केवळ मनोरजंन हाच आत्मा कायम ठेवण्यात आलेले लेखकांचे यश.


९. सर्वात महत्वाचे म्हणजे शेवटी सत्याचाच आणि धर्माचाच विजय होतो हे अधोरेखीत करणारे लेखकांचे यश.


चला तर, तुम्ही ही वाचा या लेखकांच्या कादबंरया आणि आपला आनंद शतगुणित करुन घ्या तर.!!!!