अतृप्त

भिजले वळवाच्या सरीने मी पुरते!
विझले ,पण जराजराशी मी जळते!


लदबदला होता फुलांनी पारिजात
गंध कसा आवरू भिणला आकाशात


आला घन गरजून मी चिंब चिंब
बळजोरी मुजोर त्याची,मी सुखात दंग!


चुकले असेन मी जरासे ,मज कळते!
पुन्हा पुन्हा चुकण्यास पण मी तळमळते!


                शिवश्री गणेश धामोडकर