झट्पट कोथिंबीर वडी

  • चिरलेली कोथिंबीर १ वाटी
  • चण्याचे पीठ (बेसन) १ ते दीड वाटी
  • तिखट १ च. चमचा ,मीठ चवीप्रमाणे ,हळद १/४ च. चमचा, तीळ १ च. चमचा (अथवा चवीप्रमाणे)
  • पाणी, इनो फ़्रुट सॉल्ट १/४ च. च.
  • तळण्यासाठी तेल
१५ मिनिटे
२-३ जणांसाठी

कोथिंबीर धुवून ,निथळून एका भांड्यात घ्या.

इनो आणि पाणी सोडून इतर सहित्य एकत्र करा

नीट मिसळून घ्या.

पाणी घालून सैलसर भिजवा (साधारण भज्याच्या पीठासारखे/थलथलीत)

इनो किन्चित पाण्यात मिसळून लगेच मिश्रणात घाला ढवळा.

सुक्ष्म लहरी भट्टीत (मायक्रो वेव्ह ओव्ह्अन) वपरण्यायोग्य काचेच्या भांड्याला तेलाचा हात फ़िरवून मिश्रण ओता. झाकण ठेऊन १००% उष्णतेवर ३ते४ मि. ठेवा.मग झाकण काढून ५०% उ.वर १ मि. ठेवा.

बाहेर काढून वड्या कापा .तेलात परता अथवा खमंग तळा.

आणि व्वा! म्हणत खा.

 

ओल्या नारळाची चटनी किंवा सॉस बरोबर खाव्या.

स्वानुभव