शेअर बाजार

      मनात धंदा करण्याची त्या अनुषंगाने जास्तीतजास्त अद्ययावत माहिती आणि त्या माहितीचे योग्य विश्लेषण करण्याची सवय जर मनाला असेल तर कुठ्लाही धंदा करणे कुठ्ल्याही माणसाला अशक्य नाही. मग ते कुठल्याही वस्तुचे ट्रेडिंग असो अथवा जास्त पैसे मिळवून देणारा, क्षणाक्षणाला मिळकतिची संधी उपलब्ध करुन देणारा शेअर बाजार असो.


      दुर्दैवाने शेअर बाजार म्हणजे सट्टा बाजार, पैसे बुडणार, जुगारिपणा, अनैतिक धंदा, ईभ्रतीचा धंदा नाही वगैरे अनेक गैरसमज पुर्वीच्या पिढीने पुढच्या पिढीपुढे ठेवले. ज्यामुळे एका (कदाचित  मराठी )समाजाचे आर्थिक नुकसान झाले जे भरुन काढण्यासाठी नंतरची संपूर्ण पिढी खर्ची पड्णार आहे. कारण बाजाराची ओळख, सखोल माहिती, प्रत्यक्ष ट्रेडिंग, नफ़ा ई. गोष्टी जमवून यायला वेळ लागणे क्रमप्राप्तच  आहे. त्या अनुषंगाने मनोगतवर एक लेखमाला सुरु करण्याचा मानस आहे कारण जास्तीतजास्त माहिती मराठीतून आणि मराठी माणसासाठी  उपलब्ध व्हावी हा एकमेव हेतु.......मग तुमचे काय मत??? मी सुरुवात करावी का???