जाण

जो जाणेना अन जाणेना की जाणेना काही...
तो मूर्ख तयाला जाण कशाची कधीच आली नाही!

जो जाणे पण ना जाणे की तो जाणे काही...
जागवा तयाला जाण करून द्या पकडून दोनी बाही!

जो जाणेना पण जाणे की तो जाणेना काही..
तो मनुष्य आहे शुद्ध, त्यामध्ये सखा जवळचा पाही!

जो जाणे अन हे जाणे की तो जाणे सगळे काही...
मानले गुरु मी त्याला, माझा देव त्यामध्ये राही!!!