टोमॅटो सूप

  • लाल टोमॅटो छोटे ६, छोटा अर्धा कांदा, एक छोटा बटाटा
  • लाल तिखट, मिरपूड, साखर, मीठ
३० मिनिटे
२ जणांना

टोमॅटो अर्धे चिरून, कांदा कापून व बटाटा अर्धा चिरून एका पातेल्यात घालून त्यात थोडे पाणी घालून कूकर मध्ये शिजवून घेणे. गार झाल्यावर त्यातील पाणी एका पातेल्यात काढणे. बटाट्याची व टोमॅटोची साले काढणे. नंतर शिजवलेले टोमॅटो, बटाटा व कांदा थोडे पाणी घालून मिक्सर मधून एकजीव करुन घेणे. नंतर हे एकजीव झालेले मिश्रण चाळणीतून गाळून घेणे. नंतर शिजवताना घातलेले पाणी की जे आधिच काढलेले आहे ते पण या गाळलेल्या मिश्रणामधे घाला.

नंतर या मिश्रणामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट, मिरपूड, मीठ व साखर घालून एक उकळी आणणे. झाले सूप तयार.

टोमॅटो सूपास कांद्यामुळे तिखटपणा व बटाट्यामुळे दाटपणा येतो.

गाळून घेतल्यामुळे टोमॅटोतील बिया व मिक्सरमधे बारीक करताना जर बटाट्याचे तुकडे राहिले असतील तर ते सूपामध्ये येत नाहीत. एकजीव व दाट सूप होते.

रोहिणी

नाहीत.

बहिण सौ रंजना जेरे