म्हणूनच एक क्षण तरी माझ्यावर प्रेम कर...

काळ्या ठक्कर अंधारातून आली तेजस्वी किनार


नजरेतुन नजर झाली आरपार


 


हजारो लाखो असतील तुझ्या मागे पुढे


कदाचित तुझ्या लेखी असो आम्ही त्यातलेच एक बाजीराव फाकडे


 


खऱ्या खोट्या प्रेमाची जाण फक्त तुलाच आहे..


म्हणूनच मोडेन पण वाकणार नाही म्हणणारा हा पठठया तुझ्यापुढे नमायला तयार आहे


 


माहितेय ...माहितेय... सगळचं आपल्या मनासारखं घडावं असं नसतं काही


पण भावना पोचल्या तुझ्यापर्यंत आणि एक स्मितहास्य आलं....


 


तर समजेन एका क्षणापुरतं तरी माझ्या प्रेमाला दाद दिली.. !!!


आणि मी यातचं सारं आयुष्य सामावून बसेल....


 


त्या एका क्षणाला मी ब्रम्हदेवाचा क्षण समजतो..


कारण त्यामुळेच सात जन्म मी तुझं प्रेम मिळवू शकतो


 


म्हणूनच एक क्षण तरी माझ्यावर प्रेम कर


 


कमीतकमी नुसतीच कविता वाचू नको..


तर तुला काय वाटले ते जरुर मेल वा स्क्रप कर....!!!


...तुझाच  विभास