ये दिल और उन की निगाहों के सायें
या मूळ हिंदी गीताचा मराठी अनुवाद
हृदय आणि त्याच्या नजर सावल्या त्या
हृदय आणि त्याच्या नजर सावल्या त्या ।
मला घेरताती, बाहू सावल्या त्या ॥ धृ ॥
पहाडांना चंचल किरण स्पर्शताती ।
हवा नदी नदीच्या जला स्पर्शताती ।
इथुन तिथवरी आसक्त सावल्या त्या ॥ १ ॥
बिलगताती वृक्षांना मेघ भारलेले ।
प्रकाश अन् तमाचाही लपंडाव चाले ।
गार गार असती मार्ग सावल्या त्या ॥ २ ॥
हरखती मने ती, मुभा लाभल्याने ।
किती मिळती जुळती निसर्गाशी मने ।
रंग नाहलेल्या प्रेम सावल्या त्या ॥ ३ ॥
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६०५०४