उलटसुलट

उलटसुलट केले काळजाला जरासे
परत उचकले मी ड्रॉवराला ज़रासे


हसत बचत पेटी काढते आज खोडी
सतत गमवते ती साठलेले ज़रासे


चलबिचल कशाला होतसे मागण्याची
पसरि करहि मित्रांसमोरी मी ज़रासे


"सहज़ बघ विसरलो, पाकिटाला कसा मी"
(हळुच फ़सवती  ते मित्र  माझे जरासे)


विसर पडत नाही संपणाऱ्या खिशाचा
फ़िरुन छळत जातो सासऱ्याला ज़रासे


                                                           साती काळे


(चक्रपाणिच्या ओळखीने मालिनीशी पहिल्यांदाच हात मिळवलाय.त्यामुळे शब्दांच्या मोडतोडीबद्दल "जाणते" क्षमा करतील ही अपेक्षा!)