कोडे - पैसे कशाचे?

ग्राहक : मालक, हा शर्ट कितीला देणार?
दुकानदार : ५०० रुपये.
ग्राहक : ठीके. हा बाजुला ठेवा. मी घेतो हा शर्ट.
दुकानदार : ठीके साहेब.
ग्राहक : मालक, ही पँट कितीला देणार?
दुकानदार : ८०० रुपये.
ग्राहक : अरेरे ! माझ्याकडे पैसे नाहीत एवढे. मालक, असं करा शर्टाच्या बदली तुम्ही ही पँटच फक्त द्या मला.
दुकानदार : ठीके साहेब.
ग्राहक ३०० रुपये काढून दुकानदाराला देतो व पँट घेऊन जायला निघतो.
दुकानदार ग्राहकाला थांबवत : अहो साहेब, हे फक्त ३००च रुपये आहेत. पँट ८०० रुपयाची आहे.
ग्राहक : मी पँट शर्टाच्या बदल्यात घेतली आहे.
दुकानदार : अहो मग शर्टाचे पैसे तरी द्या.
ग्राहक : अहो मालक, पण मी शर्ट घेतलाच कुठे आहे तुम्हाला त्याबद्दल मी पैसे द्यायला?