अजब टक्केवारी

एक माणूस घरोघरी जाऊन टोमॅटोचा सॉस विकत होता. लोकांनी त्याला विचारले, "हा सॉस शुद्ध आहे कां?"


त्याने सांगितले, " मी खोटे बोलणार नाही. यात ९०% टोमॅटो आणि १०% इतर खाद्यपदार्थ आहेत पण मी तुमच्याकडून बाजारभावाच्या फक्त ८०% किंमत घेत आहे. म्हणजे तुमचा फायदाच आहे." त्याच्या कडील सर्व बाटल्या एकाच दिवशी खपल्या.


दुसरे दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी लोकांनी सॉसची चव घेऊन पाहिली ती विचित्रच लागत होती. पण तो विक्रेता पुन्हा त्या बाजूला फिरकलाच नाही. एका माणसाने त्याला शहराच्या दुसऱ्या भागात फिरतांना पाहिले आणि पकडले. तो पुन्हा म्हणाला, "देवाशप्पथ सांगतो, यांत ९०टक्के टोमॅटो आहेत. खोटे वाटत असेल तर माझ्याबरोबर कारखान्यात चला."


दोघे कारखान्यात गेले. तिथे एक माणूस यंत्रामध्ये कच्चा माल टाकत होता. मोजून नऊ टोमॅटो आणि एक भोपळा. ९०% टोमॅत\टो आणि १०% भोपळा!!!