साहित्य परिषदेची शताब्दी

नमस्कार.


मराठी साहित्याचा इतिहास ज्या नावाशिवाय पूर्ण होणार नाही, अशी  साहित्यिक उपक्रम राबविणारी आद्यसंस्था "महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे "उद्या दि.२७ मे २००६ रोजी आपला १०० वर्षांचा एक टप्पा पूर्ण करून १०१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.या संस्थेचे माझ्या माहितीनुसार सुमारे८००० सदस्य आहेत. संपूर्ण विश्वात ते पसरले आहेत. महाराष्ट्र साहित्य पत्रिका हे मुखपत्रही असेच उत्तम साहित्यिक नियतकालिक मानले जाते. या साहित्य संस्थेच्या सदस्यांची नावे देणे म्हणजे अक्षरशः वेडेपणा ठरेल, कारण मराठीतील एकही साहित्यिक असा नाही की ज्याचा या संस्थेशी कधीच संबंध आला नाही.माझ्याप्रमाणेच अनेक मनोगतीही या संस्थेचे सदस्य असतील. एका उच्च दर्जाच्या मातृसंस्थेचे सदस्य असणे हे नक्कीच अभिमानाचे आहे. लोकमान्य टिळक या संस्थेच्या स्थापकांपैकी एक होते यातच सर्व काही आले.  या निमित्ताने  संस्थेच्या सर्व सदस्यांचे व संपूर्ण संस्थेचे एक सदस्य म्हणून हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा.


अवधूत कुलकर्णी.