.... प्रेम आंधळ असतं !

.....प्रशांत ने सांगितलेली एक सुंदर कथा ...


......तिला जगातल्या सगळ्या सगळ्यांचा राग येत असे, अगदी तिच्या लहानग्या गोंडस बहिणीचा सुद्धा. तिच्या आई बाबांनी खूप प्रयत्न केले तिच्या मनातली ती विचित्र अढी काढण्याचा, पण तिने मात्र डोक्यात राख घालून घेतलेली. त्याला कारणही होते तसेच ... ऐन तारुण्याच्या भरात झालेला तो अपघात आणी त्यात गेलेली तिची दृष्टी ...


.... पण आता तिच्या आयुष्यात आता तो आला होता. प्रेमाचे गोड गुपित होते त्यांचे. त्याच्यावर मात्र ती भरभरून प्रेम करायची. त्याच्या सहवासात तिच्या चित्तवृत्ती फुलायच्या. त्याला नेहमी म्हणायची ती "मी जर का बघू शकले ना परत, तर लग्न करायचंय मला तुझ्याशी."


..... अचानक एका दिवशी तिला कोणीतरी डोळे दान केले होते. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रीये नंतर काही दिवसांनी तिला परत पुर्ववत दिसू लागते. बरेच दिवस झालेले असतात पण तो काही तिला अजून भेटलेला नसतो. ती व्याकुळ.


..... शेवटी तो दिवस उजाडतोच. घाई घाईने ती ठरल्या वेळे अगोदरच पोहचते. लाल रंगाचा सदरा घालून येणार असतो तो. तिची नजर ठरत नसते ... सारखी भिरभिरत शोधत असते त्याला. लांबूनच दिसतो तो. तिच्या डोक्यात जणू हजार बॉम्बं फुटतात. तोच काळा चष्मा आणी तोही असतो आंधळा.


..... लग्नाला ती मग साफ नकार देते. तो मोडून पडतो .... परत फिरतो आपल्या रस्त्यावर. जातांना तिला म्हणतो .... " नाहीस केले लग्न माझ्याशी, ते ठीक आहे ... पण डोळे मात्र माझे तू नीट सांभाळ".