ढुरढूरढूर झाली



ढुरढूरढूर झाली
आत्ताच टूर झाली

कैरी वयात आली
पण आमचूर झाली

मी पाक-पाक झालो
ती मोतिचूर झाली

ओशाळलो, अशी ती
लाजून चूर झाली

बदनाम नाव झाले
ख्याती जरूर झाली

ओठांस ओठ भिडले
ताकास तूर झाली

प्रेमात काय पडलो!
बुद्धी फितूर झाली

झाली कुणाकुणाची?
(ती कोहिनूर झाली!)



टीकाराम