(लोकांना टाळत बसलो आहे)


साऱ्या लोकांना टाळत बसलो आहे
मी देशी अशीच गाळत बसलो आहे


सखये रागावू नकोस मजला ऐशी
मी अपुले घर सांभाळत बसलो आहे.


का तुझा भाऊ गे माझ्या मागुन येतो?
(मी तुझीच मांजर पाळत बसलो आहे)


ती दिसता मीही धावत सुटलो होतो
तू दिसलीस नि ओशाळत बसलो आहे


नाहीच पुरावा  तांदूळाचा कोठे
मी गणंग असेच चाळत बसलो आहे


नदीला कधीचा पूर येऊन गेला
मी काठ खुळे कवटाळत बसलो आहे


गल्लीत कितीक लोक आले अन गेले
त्यांचा हिशोब पडताळत बसलो आहे


-कारकून


आधारित- मी आठवणींना टाळत बसलो - प्रसाद 
(वृत्तात सूट घेतली आहे, जरी मात्रा कायम आहेत, क्षमस्व)