आतंकवादी शक्तींचा
पुन्हा एक वार झाला
देशाच्या अस्मितेवर
भयानक प्रहार झाला
पुढे काय करायचे
प्रत्येकाचा मार्ग वेगळा
कोणी रक्त गोळा करतोय
कोणी मते करतोय गोळा
पुन्हा स्वतःत गाफिल माणूस
खडबडून जागा झाला
कुणाची हळहळ तर कुणाचा
सरकार विरूद्ध त्रागा झाला
कोण बातमी आधी देणार
चढाओढ वाहिन्यांची
बातम्या देताहेत कशी आहे
सुरक्षा भेट देणाऱ्या नेत्यांची
मी रक्त देऊन आलोय
होईल का पण तेवढ्याने?
इतक्या हानीची भरपाई
कशी होईल माझ्याच्याने?
खंबिर पणे उभे राहायला
मला तुझा आधार हवाय
अराजक शक्तींशी लढायला
प्रत्येकाचा आधार हवाय
तुषार जोशी, नागपूर