कुजके पाष

"कुजके पाष"

तुला तुझं कुणीतरी मिळालय मला एकटा करुन टाक

तुझं  नविन जग सुरु कर मझे कुजके पाष तोडुन टाक 

पण जुने प्रश्न सतावतात आधी त्यांना समजावून सांग

तू मझ्याशी वागलीस तो तुझ्या विरंगुळ्याचा खेळ सांग

मग मी समजेन कमीपण माझ्यातच आहे

तुझं नशीब पटिंत माझी स्वप्नं शुन्यात आहेत

आणि तसा नाही मी तुटणार डोळ्यात डोळे घालुन सांग

मी केलं ते प्रेम अन् तू तुझा विरंगुळा केलाय सांग   

                 ===============

तुला तुझं कुणीतरी मिळालय मला एकटा करुन टाक

तुझं  नविन जग सुरु कर मझे कुजके पाष तोडून टाक

पण ते कसा सहन करणार आधीच कोडगा करुन टाक

नव्या जखमांना जागाच नको माझा कणन् कण छेलून टाक

तुझ्या श्वासांत फुललेले माझे श्वास गुदमरुन टाक

तुझ्यात खळखळलेलं हसु जगाचं हसणं करुन टाक

तुझ्यावर कविता रचलेले माझे हात छाटून टाक

रचना-रचना मिटून माझे शब्दच गोठून टाक

मनाला चिकटलेल्या तुझ्या आठवणी ओरबाडून टाक

तूझ्या आठवणीत जागवलेल्या माझ्या रात्री परत करून टाक

मिटल्या डोळ्यांत ओल्या पापण्यांत स्वप्नं धूराऊन टाक

जुने बंध पोळणार नाहीत एवढ्या संवेदना होरपळून टाक

तू बंध तोडून बेधुंद हो मला बेबंद करून टाक

तुला तुझं कुणीतरी मिळालय मला एकटा करुन टाक

तुझं  नविन जग सुरुकर मझे कुजके पाष तोडुन टाक  

            ===============             

पण जुने प्रश्न सतावतात आधी त्यांना समजावून सांग

तू मझ्याशी वागलीस तो तुझ्या विरंगुळ्याचा खेळ सांग

नाहीतर जाऊ दे, लाखो प्रश्न, दुर्लक्ष कर, टाळाटाळीची उत्तरं साग

तू दाखवलेल्या आपुलकीचा, मीच अनर्थ लावला सांग

तुझ्या नजरेत प्रेम होतं, गोंधळतेस काय, माझा गैरसमज सांग

वाट पाहायचीस माझ्या येण्याची, आता त्याचंही, वेगळच कारण सांग

कविता तुझ्यावर लिहुन मागायचीस, अगदि हट्टच का धरायचिस सांग

मी कसा जीव ओतून लिहायचो, कधी कळलच नाही सांग

ईतरांशी वरवरचं, स्वतःशी खास बोलण्याची अपेक्षा, का करायचीस सांग

तूझं प्रेम होतं, ओठ लगेच नाही म्हणतिल, मनाला विचारुन सांग

आणि जर नव्हंत तसं, मी वहावतं होतो, वेळीच का नाही सांगितलसं सांग

कळंत होतं मी प्रेमात पडतोय, जवळचेना आपण, वेळीच का नाही थोपवलस सांग

खंर तर घडलं ते खोटं, सगळंच अनुत्तरित, मग तू काहीही सांग

मी जरी भिजून सुखावलो, तू ओलावाच नव्हता सांग

पण जुने प्रश्न सतावतात आधी त्यांना समजावून सांग

तु मझ्याशी वागलीस तो तुझ्या विरंगुळ्याचा खेळ सांग

-संजय