आता म्हणे
ते पाडणार आहेत ताज-महाल आणि
तिथं बांधणार आहेत नवा 'ताज-मॉल' !
त्यासाठी कधीच येऊन पोचलेत परदेशातून 'मेसन्स'
आणि देशी गवंड्याचे हात छाटून टाकल्या गेलेत केंव्हाच.
असंही ऐकतोय की
'साहीर लुधियानवी' ने नवा शेर लिहायला घेतलाय!*
'नये शहनशाहोने हूकूमत का सहारा लेकर
पुराने शहनशाहों के मुहब्बत का उडाया है मजाक'
आणि
तो क्षीण,मरणासन्न शहाजहान मात्र
बंदीवासातून पाहतोय हे सगळं निमूटपणे
तेंव्हाही आणि आताही.....!
(जयन्ता५२)
* 'साहीर लुधियानवी' चा मूळ शेर
'एक शहनशाहने दौलतका का सहारा लेकर
हम गरीबों की मुहब्बत का उडाया है मजाक'