मदत हवी आहे

मनोगतावर विविध विषयांवर काव्य प्रकाशित करणारे अनेक सदस्य आहेत.  मला इयत्ता आठवी / नववी मधील मुलांना १५ मिनिटे त्यांच्या शरीरात होणारे बदल हे नैसर्गिक आहेत तेव्हा त्यांच्यातील बदलांना अनुसरून त्यांनी आपली क्षमता कशी वापरावी याविषयी काही सांगायचे आहे.  एक डोक्टर मित्र वैद्यकीय बाजू सांभाळणार आहेत.
पौगंडावस्थेत प्रवेश करणाऱ्या १३-१४ वर्षाच्या मुलांना, त्याच्यातील होणारे बदल नैसर्गिक असून , त्यांनी गोंधळून न जाता त्यांची वाटचाल एक सुसंस्कृत नागरिक होण्याकडे कशी राहील किंवा आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यात त्यांनी कसे लक्ष केंद्रित करावे  अशा प्रकारचा संदेश असणारी अशी कविता मला हवी आहे.  फार मोठी नसली तरी चालेल दोन कडवी असली तरी हरकत नाही. (या मुलांना लेक्चर नको असते याची अनुभवी सदस्यांना कल्पना असेलच)


धन्यवाद