बंडू शाळेत जातो!

स्थळः बंडूचे घर,
वेळः सकाळी शाळेत जाण्याची...


पालकांची हातघाई चालली
बालकाची गाइगाई चालली


टोकयंत्रातून फिरल्या पेन्सिली
मोकळ्या पेनांत शाई चालली


बांधती बाबा बुटाचे बंद अन
शर्ट खोचायास आई चालली


घेतले पाठीवरी ओझे स्वतः
खेचुनी बंडूस ताई चालली


(आणि अचानक)


धावतो शाळेत का बंडू अता?
चालली... शाळेत 'जाई' चालली!


प्रेरणाः गणेश धामोडकर यांची हातघाई ही गझल