सर्व नाती दोन दिसांची आणि शेवटी सारेच एकटे! हेच सत्य आहे. शेवटी फक्त मी तुझा, तू माझा
चल सोडून जाऊ आता
ही दोन दिसांची वस्ती
ही जन्म-मृत्यूची चर्चा
ही ऊठाठेव रे नसती
हा देह झिजवला साथीने
अन लाख मोजले श्वास
ही उडून चालली पहा कशी
दशदिशांत माझी राख
मन लावून रचला त्यांनी
हा माझा अंतीम साज
'मी आहे त्यांचा' भ्रम हा
हे क्षणांत कळले आज
जाळून टाको, पुरुन टाको
होऊ देत देहान्त
तू असता माझ्यासंगे
सुसह्य हा एकांत
सोडून जाणे नाती सारी
हे आहे सतीचे वाण
एकरुप निःसंग होऊ चल
मी तुझा, तू माझा प्राण
--------अभिजित पापळकर