जर्मनीस्थित मनोगती?

माझ्या चाकरीच्या कामानिमित्त मी ३-४ दिवसासाठी जर्मनीमध्ये जाणार आहे.  अमेरिकेतून हँबर्ग येथे गुरुवारी संध्याकाळी पोचेन.  त्यानंतर तिथल्या आमच्या गोष्टी तयार करून देणाऱ्या संस्थेमध्ये बघणे आणि तपासणी अशी कामे शुक्रवारी करणार.  गुरुवार रात्र आणि शुक्रवार दुपारचे भोजन आणि इतर चहापाणी ते पुरवतीलच.


त्यानंतर मी परतीचे विमानाचे तिकीट म्यूनशेन (म्यूनिक) पासून मंगळवारी सकाळचे काढले आहे.  हँबर्ग ते म्यूनशेन आगगाडीने जाईन असे म्हणतो.


तेव्हा हँबर्ग, म्यूनशेन, फ्रांकफुर्ट अशा ठिकाणी कोणी मनोगती असतील तर एक उत्स्फूर्त कट्टा करायला अतिशय आवडेल.


तसेच या २-३ दिवसात काय अवश्य पाहावे, काय काय करू शकतो ह्या बद्दल जाणकारांनी सल्ला दिला तर फाल मोलाचा ठरेल.


याला प्रतिसाद म्हणून अथवा मला व्य. नि. पाठवून मनोगतींनी माझी ही जर्मनी-यात्रा सुफल करण्यास मदत करावी ही विनंति,


कलोअ,
सुभाष