रिमझिमणारा पाऊस अन दाटून आलेलं आभाळ..
अंधारलेली कुंद हवा, थबकलेला काळ..
वेळ तशी दुपारचीच, तरीही कातर कातर..
आणि त्यात टपरीवरच्या रेडिओतील जगजीतची भर..
"होशवालोंको खबर.." ऐकून बेहोष झालेला मी..
काय हवं अजून? .. फक्त तुझीच कमी..
मी केलंय बंक कॉलेज .., तुला मात्र लेक्चर..
तुला नाही बोलावत का ही वेडावणारी सर..?
मी बाहेर चिंब... अन तूही बहुदा आत..
मी गातोय मोठ्यांनी .. अन तूही आतल्या आत..
मी उभा, हातात भिजल्या कवितांची वही..
मोबाईलच्या निळ्या प्रकाशातली तुझी उजळलेली छबी..
थांबून जावं सगळं एकदम.. गोठून जावं जग..
फक्त तू वळून एकदा खिडकीबाहेर बघ..
कोरून घ्यायचाय क्षण सखे हा हृदयामध्ये मला..
मुद्दामूनच तुला आत्ता मिस्ड कॉल दिला!!
- मुरारी