'भरात आहे'...२

सुमनात गंध कोठे जो खेटरात आहे
बैसून गर्दभावर माझी वरात आहे

बाईल जी दुज्याची, का पूजिता तियेला?
ही खूण लंपटाची साऱ्या नरात आहे

चंद्रास रोहिणी ही भेटावयास आली
सवतीसवे तयाची ज्वानी भरात आहे

मी खोदतो कधीचा खड्डा तिच्याचसाठी
बुडण्यास खोल पाणी कुठल्या थरात आहे?

घ्या आज बायकांनो नवऱ्यांसवे जराशी
मदमस्त जागण्याची " 'रम'णी "य रात आहे

काढाच धिंड माझी, तो खोडसाळ वदला
खोडी विडंबनाची मम अंतरात आहे



प्रेरणा - मानस6 ची  गझल 'भरात आहे'...
http://www.manogat.com/node/6212