स्वतंत्रता दिवस - ९ ऑगस्ट व १५ ऑगस्ट

नमस्कार मंडळी,
९ ऑगस्ट, सिंगापुर स्वतंत्रता दिवस.
१५ ऑगस्ट, भारत स्वतंत्रता दिवस.


लहानपणी, शाळेत असतांना एका दिवसाची आतुरतेने वाट बघितली जायची, तो दिवस म्हणजे १५ ऑगस्ट. आपल्या देशाला स्वतंत्रता देणार्‍या स्वातंत्र्-सैनिकांनी कष्ट घेवुन पुढच्या पिढीला दिलेल्या एका भेटीचा दिवस. सकाळी लवकर उठुन शाळेत ध्वज्-वंदन करतांना ह्यामागे एक देशभक्तीची भावना असायची. ढगाळलेल्या वातावरणात, प्रमुख पाहुण्यांचा उपस्थितीत, स्वतंत्रता दिवशी ध्वजाला salute करतांना व 'जरा याद करो कुर्बानी' एकतांना ऊर अगदी भरुन यायच. नंतर लाल किल्यावरच भाषण T.V वर बघितल्या नंतर भारताच्या प्रगतीची कल्पना यायची. .... कमी-अधीक आपल्या बहुतेकांचा हा अनुभव.
काळापरत्वे ह्या दिवशीचा सकाळचा ध्वज्-वंदना चा कार्यक्रम झाल्यावर बाकी दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये पण बदल झाला. केबल T.V. channels वर 'स्वतंत्रता दिवस विशेष' सादर व्हायला सुरुवात झाली. क्रांती, कर्मा, उपकार, पुरब्-पश्चिम, क्रांतीवीर,.... असे चांगले सिनेमा बघायची हमखास वेळ ह्या आठवड्या मध्ये व्ह्यायला लागली. रंगोली तर पुर्ण देशभक्ती च्या गान्यांणी भरलेली असायची....... पण त्याच्या पुढे काय?
१९४७ ला लाल किल्ला वरुन भाषण करतांना नेहरुजींनी म्हंटले होते, when all the words is asleep, india awakes . पण खरच is india awake? . मोठा प्रश्न आहे. निव्वळ एक सुटीचा दिवस म्हणुन ह्या दिवसाकडे आता बघितल जावु लागले आहे. वर्षात असणार्‍या १२ हक्काच्या सुटीपैकी एक दिवस. आपण मोठे लहान मुलांना ह्या दिवसाच महत्व सांगतो पण आपण स्वत:?. एक प्रश्न स्व्:ताला विचारा आणि खर उत्तर सांगा. मोठे झाल्यावर आपल्या पैकी किती जण सार्वजनीक ध्वज्-वंदनाला गेलोय? मुळात हे विचारा की, शेवटच्या कोणत्या वर्षी मी ध्वज्-वंदन केलय?
३५ वे प्रेसिडेंट, जे.एफ़. केनेडी नी त्यांच्या देशाला केलेल्या पहील्या भाषनात राष्ट्राला उद्देशुन म्हंटले होते, Ask not what your country can do for you, ask what you can do for your country . त्यांच्या देशाने त्या वाक्याचे महत्व ओळखुन प्रगती केली. सिंगापुरचे पहीले प्रधान मंत्री Lee Kuan Yew ह्यांनी T.V समोर जनतेला केलेल्या भाषणात जनतेच्या प्रश्नांना महत्व दिले. ...Singapore shall be forever a sovereign democratic and independent nation, founded upon the principles of liberty and justice and ever seeking the welfare and happiness of the people in a most and just equal society... आज सुद्धा त्यांच्या विचारांना महत्व आहे. ह्या विचारांवर केलेल्या प्रगतीचे फ़ळ हे देश आज चाखत आहे.

सिंगापुर मध्ये आज सुद्धा ९ ऑगस्ट ला प्रत्येक देशवासी त्यांच्या घरावर देशाचा झेंडा अभिमानाने फ़डकवितो. केवळ एक सुटीचा दिवस म्हणुन न बघता एक प्रगतीचा दिवस म्हणुन ९ ऑगस्ट ओळखला जातो. एका तासात रेल्वेने पुर्ण कव्हर करता येणार्‍या ह्या देशात प्रगती जागोजागी दिसते. चांग़ी एअरपोर्ट पासुन बून ले पर्यंत आणि मरीना बे पासुन वुडलँड पर्यंत. अगदी रेल्वेचा प्रवास सुद्धा अगदी शिस्तबद्ध. रस्ता क्रॉस करतांना देसी रिक्षावाले जसे दुसर्‍याच्या नावाचा(आणी त्याच्या पिढ्यांचा) उदघोष करतात, इथे तो नाही. भारताने स्वातंत्र्यानंतरच्या ५९ वर्षांमध्ये केलेल्या प्रगतीची आर्थिक, सामाजीकदुष्ट्या तुलना सिंगापुर च्या ४१ वर्ष स्वातंत्र्य मिळालेल्या सम्रुद्ध राष्ट्राबरोबर करतांना एक जाणवते, शिस्त फ़क्त बोलण्यात न ठेवता आचरणात आणणे ही महत्वाचे असते. नेमका हाच मुद्द आम्ही विसरलो. हमे यह करना है, हमे वोह करना है. .... ह्याच्यामध्ये वेळ दवडुन सामर्थ्य व्यर्थ घालविण्यापेक्षा काहीतरी समाजोपयोगी काम करण्यात वेळ जर आम्ही invest केला असता तर नक्कीच २०२० एवजी २००२ मध्ये आम्ही महासत्ता झालो असतो. अहो जिथे माझ्या देशाचा झेंडा माझ्या घरावर फ़डकवायला ५ शतक लागतात, तिथे लाल फ़िताशाही कशी असेल ह्याची कल्पना केलेलीच बरी. चांगीवर विमान लँड झाल्यानंतर मी ३० मिनटात बाहेर असतो. आणी मलाच चांगला एक तास छत्रपती शिवाजी इंटरनेशनल वर (हुज्जत करत?) घालवावा लागतो. ही आमची प्रगती नक्कीच असु नाही शकत.

मागच्या महीन्यात जाहीर झाल्याप्रमाणे आताचा सिंगापुर मधला बेकरीचा दर ५ वर्षामधला सगळ्यात कमी आहे. म्हणजेच financial analysis केल तर नक्कीच काही तरी प्रगती असली पाहीजे. मग माझ्यादेशात का नाही तशी प्रगती? उत्तर आहे, मागे विचारलेल्या प्रश्नात. मला माझ्या देशाची प्रतीज्ञा च पाठ नाही मग मी कसा काय विचार करु शकतो की कस्टम मधुन (मांडवली केल्याशिवाय?) माझा नवीन डिजीटल केमेरा बाहेर निघेल. दंड भरायचा कंटाळा, मग एक हिरवा कागद हातात ठेवल्याशिवाय ट्रेफ़ीक हवलदार सोडत नाही हो, तिथे नियमांची काय कमाल? अहो जिथे गाई-गुरांचा चारा रखवलदार खातो, आणि धर्मांधाच्या नावावर राजेरोस बाजार भरतो, तिथे टाळुवरचे लोणी आबाधीत कसे राहील?

तुम्हाला काय वाटतेय?
अजुन एका रंग दे बसंती ची गरज आहे?
तुम्ही चुकताय?.... समाज चुकतोय? प्रदेश चुकतोय? की राज्यकर्ते चुकताय?

अमित