कृतार्थ

संजोप रावांच्या कृतार्थ याच नावाच्या कवितेवर आधारित. परंतु ही कविता मूळ कवितेला दिलेले प्रत्युत्तर वगैरे नव्हे. मोह अनावर झाला म्हणून कीबोर्ड बडवला, इतकंच. कविता स्फुरलेली नाही, पाडलेली आहे, त्यामुळे "हे जरा अजून असं करायला हवं होतं" असं वाटून "ते तसं" करण्यात वेळ वाया घालवायच्या आधीच पोस्ट करीत आहे. "विडंबन" शिवाय दुसरे वर्गीकरण सुचले नाही.

रावांच्या मूळ ओळी धूसर केलेल्या आहेत.


- कोंबडी
-----------------------------------------------------------


कृतार्थ


नमस्कार.
अरे, कमालच करता साहेब
ओळखलं मी तुम्हाला.
तुम्हाला कोण ओळखत नाही?
तुमच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला
तुमच्या जाहीर सत्काराला 
होतो ना मी.
होतो ना मी.
अमुकतमुक कंपनीत
तुमच्या तिसऱ्याही कंपनीनं, केवळ दोन वर्षात
'पस्तीस वर्षाची निष्ठा...' वगैरे
पस्तीसशे कोटींचा टर्नोवर! 
चांगले बोलले तुमचे साहेब.
चांगले बोलले ... "साहेब"
पँटचं कापडही रेमंडचं आहे मला वाटतं...
आता रेमंडचेही सोल सप्लायर ना?



ब्लॉक डोंबिवलीलाच ना?

अँबी वॅलीतलं फार्महाउस काय म्ह ...

आणि दीपाचं सासर कल्याणला
ओह! ते दीपाला गिफ्ट का?
हो माहित्येय मला ...
ब ... रं
उमेशसाठी बघताय म्हणे यंदा
उमेशचा कसा चाललाय धंदा 
नोकरीवाली शक्यतो आपल्यातलीच बरी...
गारमेंट एक्स्पोर्ट? वा, म्हणजे हाताशी येणार पुढेमागे तुमच्याच



सकाळंचं फिरणं बाकी चुकत नाही हो तुमचं

सकाळचं टेनिस चुकत नसेल ना तुमचं
आणि हल्ली काय हास्यक्लब वगैरे जोरात
आणि हल्ली काय रोटरी-लायन्स जोरात 
दुपारच्या पोळ्या अडीच मोजून
ब्रेकफास्टला स्लाइसेस अडीच मोजून 
तीनचा पाऊणच कप कोमट चहा
तीनचा पाऊणच कप "टेटली ... विथ लाइम" 
संध्याकाळी पाय मोकळे करून येतायेता
संध्याकाळी लाइट वॉक करून येतायेता
देवदर्शनही जमून जाते बुवा तुम्हाला
"पेप्पर"ला फिरवणंही जमून जातं तुम्हाला



भात आणि गोड खाणं तर सोडलंयच तुम्ही
कार्ब्स आणि स्वीट्स तर सोडलंयच तुम्ही
डायबिटीसची शंका असतानसताना
डायबिटीसची शंका असतानसताना
बीपीवरची एकच दुबळी गोळी सकाळी
बीपीवरची एकच गोळी सकाळी
बरी आपली मनःशांतीला..
प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, नेहमीच म्हणता तुम्ही


वर्षातून एकदा कोकणात

वर्षातून एकदा सहकुटुंब आल्प्स
आणि शिर्डीही, हो, म्हणाला होतात तुम्ही ...
आणि शिर्डीही, हो, म्हणाला होतात तुम्ही ...
महिनाभर आधी रिझर्वेशन्स करता ना
"चॉपर" आल्यापासून ती सोय असेल नाही?
दोन्ही वेळच्या प्रवासाची
दोनतीन तासात परत! 
 



। जूनमध्ये छत्रीशिवाय
। बाहेरही पडत नाही तुम्ही
। आणि ऑक्टेबरमध्येच बाहेर काढून ठेवता
। स्वेटर, मफलर आणि कानटोपीसुद्धा
। डांबरगोळ्यांचा वास घालवण्यासाठी...


 


सोडण्यासारखं व्यसन तर कधी नव्हतंच तुम्हाला...
वायफळ थेरं कधी धरलीच नाहीत तुम्ही
परेराकडं चोरून खाल्लेलं मटण एकदाच
मात्र "एटी सी सी अंतर्गत" हात सढळ करता नेहमीच, सी ए नं सांगितल्यावर
ऑफिसच्या पार्टीत घेतलेला अर्धा पेग स्कॉचचा
आई गेली तेव्हा गावी मोठी डोनेशेन दिलीत
घाबरत तोही पण असते कशी ते बघू म्हणून
पण त्यांनी हॉस्पिटलला आईचं नाव द्यायचं कबूल केलं तेव्हाच
तेवढ्यानंही डोकं जडावलं होतं तुमचं
(पण तेवढ्यानंही डोकं "जडावलं" होतं तुमचं)
दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत
नंतर वर्षभर पार्ट्यांमध्ये
सिग्रेटच्या वासानंही मळमळल्यासारखं होतं तुम्हाला
डिस्कशन आवर्जून तिथे वळवत होतात तुम्ही
हां, तशी अधूनमधून
हं, तसे अधूनमधून
तपकीर ओढता तुम्ही, गंमत म्हणून
धावता तुम्ही एड्ससाठी, पब्लिसिटी म्हणून
पण तीही हल्ली नाहीच.
पण तेही हल्ली नाहीच



जाग्रणामुळं पित्त.. हो, ते आहे बुवा तुमचं पहिल्यापासून

वर्क इज वर्शिप ... हो, ते आहे बुवा तुमचं पहिल्यापासून
गाण्याला, अहो, सिनेमालासुद्धा वहिनी आणि मुलं एकटी यायची.
अहो, लग्नामुंजीलाही वहिनी आणि मुलं एकटी यायची
चौपाटीवरही मी पाहिलं  होतं तुम्हाला एकदा
गावीही मी पाहिलं  होतं तुम्हाला एकदा
पाणीपुरी नको, सोसणार नाही, म्हणत होता तुम्ही
हुर्डा नको म्हणालात
तुमच्या लाल रंगाच्या गरम पाण्याच्या थर्माससह...
ड्रायव्हरनं
मोठी पिशवी होती बघा तुमच्या हातात
बिसलेरी आणून दिली तेव्हा घोट घेतलात

म्हणत होता बघा, आता भेळेचे पैसे 'विवेक' आणि 'सनातन प्रभात' च्या रद्दीतून असं काहीतरी..
म्हणत होता बघा, हुर्ड्याचं "प्रॉडक्टायझेशन" करायला हवं असं काहीतरी
 ...



आणि आता दहाच्या ठोक्याला

आणि आता दर क्वार्टर ला

दोनदोनदा कड्याकुलुपं तपासून दिवा मालवताना
ड्झनभर कंपन्यांच्या बोर्ड मीटिंग्स अटेंड करताना
आपण किती सार्थ, कृतार्थ आयुष्य जगलो असं वाटत असेल ना तुम्हाला...
आपण किती ऍडवेंचरस/सक्सेसफुल लाइफ जगलो असं वाटत असेल ना तुम्हाला ...
चांगलं आहे
चांगलं आहे
चांगलंच आहे की
चांगलंच आहे की
पण माझी एक शंका
पण माझी एक शंका
हे सार्थ वगैरे सगळं ठीक आहे
हे सक्सेसफुल वगैरे सगळं ठीक आहे
पण जगणं म्हणजे काय जगलात हो तुम्ही?
पण जगणं म्हणजे काय जगलात हो तुम्ही?
नक्की?
कुणासाठी, नक्की? 
 


 


जाउ दे
नाही सांगता येणार?
नका सांगू
नाहीच म्हणता?
नकाच सांगू!
असो.