दिवसभर थकल्यावर
शांत बसायचं
चेहऱ्याला पाणी लावून
फ्रेश व्हायचं
मग चहा झाडझूड
थोडीशी आवराआवर
थोडासा नाश्ता
चहा झाल्यावर
थोड्याश्या गप्पा करत
टीव्हीत डोकवायच
मग शहाण्यासारखं
अभ्यासाला लागायचं
मन लावून करायचा
रोजचा अभ्यास
मग यायचा
"तो" एक तास
"त्या" तासात
स्वतःला भेटायचं
स्वतःच्या कवितांमध्ये
स्वतःलाच गाठायचं
स्वतःच्या वागण्यावर
स्वतःच रुसायचं
स्वतःच्या कुशीत
स्वतःच घुसायचं
मग अच्छा येते
पुन्हा भेटू म्हणायचं
आणि उद्याच्या तयारीत
झोपी जायचं
तुषार जोशी, नागपूर