श्री. अजब ह्यांनी केलेल्या 'चुपके-चुपके' च्या सुंदर भावानुवादापासुन प्रेरणा घेऊन चुपके-चुपके चा असाही एक भावानुवाद करण्याचा प्रयत्न केलाय.
'चुपके-चुपके रात-दिन'चा असाही एक भावानुवाद
मूक अश्रू, ढाळणे, दिनरात ते- स्मरते मला
प्रेमवेड्या भावनांचे, पर्व ते- स्मरते मला
खेचता, अवचित मी पडदा तुझे ते लाजुनी,
ओढणीने चेहऱ्याला झाकणे-स्मरते मला.
तुजसी मी बोलाविता, मज भेटण्या, येणे तुझे,
भर दुपारी, तेही अनवाणीच गे-स्मरते मला
विषय विरहाचा, कधी निघताच, रात्री भेटीच्या,
ते तुझे रडुनी, मलाही रडविणे-स्मरते मला.
लपुनी तु भेटायची, मजला सखे गे, ज्या स्थळी,
उलटली वर्षे परंतु, स्थान ते-स्मरता मला.
-मानस६