पिंजरा - २

व्यर्थ पांजरपोळ का पोसायचे
जर म्हशींने बंद केले व्यायचे

आठवा तळवलकरांचे ब्रीद ते
ना कुठे ' बो 'लावल्याविण जायचे

मान्यवर नेते सुकूनी चालले
दोष मतदारांस नाही द्यायचे

बिलगणे रंगात आल्यासारखे
सोवळ्यांना हे कसे समजायचे

खेळुया हा खेळ आपण जन्मभर
तू मला अन मी तुला फसवायचे

वाद अपुले ऐकू दे साऱ्या जगा
मी कशाला ह्ळुहळू बोलायचे

एक घेता घास मी ताटातला
दोन उरले दात माझे खायचे

एकमेकांना ठगाया लागलो
काय बाकी राहिले चोरायचे?

खोडसाळा फार तू सोकावला
एकदा आहे तुला भेटायचे


आमची प्रेरणा - वैभव जोशी ह्यांची सुंदर गझल 'पिंजरा' इथे वाचा