भेट नजरांची...२

भेट नजरांची तशी पहिलीच आहे
डोळीय़ांची मांडणी तिरळीच आहे

मानले बदनाम होता बेवडा तो
बाटली थोडी तरी दोषीच आहे

फत्तराचे काय आता काम आहे?
माझिया डोक्यात तू बसलीच आहे!

जाहला आरक्त माझा देह इतका
ढेकणांना रात ही अपुरीच आहे

रंगली ही भांडणाची जुगलबंदी
बायकोला खुमखुमी भलतीच आहे



आमची प्रेरणा - जयन्तरावांची सुरेख गझल
भेट नजरांची...