कोणी - २

पाव खाता असू नये लोणी
हाल माझे पुसू नये कोणी

खेकसावे खुशाल प्रेमाने
कुरकुरू, धुसफुसू नये कोणी

कुंतलांची न खूण टकलावर
पाहुनी का हसू नये कोणी?

तूप साजुक भले न द्या मजला
पण सफोला कसू नये कोणी

रात्रभर वाद चालणार अता
(एवढेही रुसू नये कोणी)

खाज येताच खाजवावे पण
खाजताना असू नये कोणी

खोडसाळा फुका झिजे बोरू
वाचणारे दिसू नये कोणी?


प्रेरणा - कोणी