पाकतल्या पुऱ्या

  • मैदा २वाट्या
  • रवा १/२ वाटी
  • चिमुट भर खाण्याचा सोडा
  • दही पीठ भिजवायला
  • साखरेचा पाक
  • वाट्ल्यास खायचा पिवळा रन्ग
  • तूप
तीन तास
४ जण

मला लग्नानंतर आईंनी ही पाककृति शिकवली. आमच्या घरी सग्ळ्यांना ह्या  पुऱ्या खूप आवड्तात.

तुम्ही पण करून बघा. मस्त लागतात.

सर्वप्रथम मैदा, रवा, सोडा एकत्र करून दह्यात भिजवून घेणे.हे मळ्लेल पीठ किमान १ तास भिज़ु द्यावे. तासभरानन्तर पुऱ्या लाटुन तुपात तळून घ्यावे आणी लगेच तयार पाकात टाकाव्यात. एक एक पुरी तळून झाली की आधीची पुरी पाकातुन काढुन चाळ्नी वर ठेवावी.म्हण्जे पाक निथळुन जायिल.

वाट्ल्यास पाकात पिवळा रन्ग टाकावा.पुरी मस्त दिसते.

 

 

आमच्या आई (सासु बाई)