चांदणे...२

तुला भेटून कळते काय असते चांदणे
कसे डासापरी देहास डसते चांदणे

उसासे सोडणे नाही बरे मी जाणतो
परी अडकून ह्या श्वासात बसते चांदणे

कधी ठेवून मजला दूर ते छ्ळते मला
कधी ऒठांवरी ऒठांस कसते चांदणे

पुरेसा चिंब भिजवुन टाकतो पाऊस मज
गळे छ्परातुनी पाणीच, नसते चांदणे

मळभ दाटून येते चेहऱ्यावर एवढे
स्वत:ला कावळा बनवून बसते चांदणॆ

कसे हे खोडसाळावर बरसते चांदणे
तुझ्या इतकेच का निर्लज्ज असते चांदणे ?



आमचे प्रेरणास्थान - वैभव जोशी ह्यांची सुंदर गज़ल चांदणे