मन जाहले...२

मन जाहले दिवाणे
ऐकावयास गाणे

दिडकी खिशात नाही
मुजऱ्यास काय जाणे ?

मनु पंढरीस जाते
तनु शोधते सटाणे

खाण्या खमंग पोहे
आले मुली पहाणे

चित्तास उपरती दे
सोडी तुपाळ खाणे

दिवसा कमलहसन पण
रात्री रती उधाणे

त्यज आरशातुनी हे
चोरून मज पहाणे

करतात म्याव हल्ली
मागील वाघ ढाणे

चालेल काय खोटे
तव खोडसाळ नाणे ?

प्रेरणा - जयन्ता५२ ह्यांची गझल मन जाहले...