अमेरिकेत माझ्या पूर्ण झालेल्या माझ्या अनेक स्वप्नांपॆकी एक म्हणजे गाडीतून दूरच्या प्रवासाला जाणे. प्रत्येक सहल ही वेगळा उत्साह, आठवणी आणि फोटोनी सजलेली. :-) पण मला एखाद्या सहलीबद्दल नाही तर प्रवासाबद्दल सांगायचे आहे.कारण द जर्नी इज मोअर ब्यूटिफुल दॅन द डेस्टिनेशन.
तर एका शुभ्र सकाळी किंवा सुखद संध्याकाळी ही ट्रीप सुरू होते. ३-४ दिवस, २ चालक(ड्रायव्हर्स) आणि १०००-१२०० मैल असे गणित असते. उत्साह ओसंडून वाह्त असतो. गाडीत बसल्या-बसल्या सामानाची यादी पडताळणी सुरु होते. मग मुलींची(हो अजूनही बायका आणि पुरुष असे उच्चार अंनवळ्णी पड्ले नाहीयेत माझ्या), तर मुलींची नवीन कपडे घेणे, पॅकिंग करणे, घर आवरणे यात कशी घाई झाली याची चर्चा सुरू होते.आणि मुलांची, नविन गाडीचे कंट्रोल, आरसे सेट करणे व ऑफिसच्या राहीलेल्या कामांबद्द्ल. सारा उत्साह, सारे विषय आणि लोक पकडूनही एका तासात बोलणे संपून जाते. आता तुम्ही सोबत जाणारया मित्राला खूप दिवसांनी भेटत असाल किंवा तुम्ही प्लॅन बद्द्ल उत्सुक असाल तर अजून अर्धा तास पकडा.
मंड्ळी गाडीत एकदम 'सेट' होऊन जातात. हायवे ला लागल्याने चालक पण तालात आलेला असतो :-)गावातून बाहेर पडल्यावर मार्गदर्शकही निवांत बसतो. चिप्स, कोल्ड ड्रिंक्स,घरगुती खाद्य पदार्थ तोंडात पडायला लागतात. पोट पूजा पण झाली. अजून अर्धा तास गेला.गाणी !!कुणीतरी सांगते सीडी टाक रे एक. मग गाण्यांच्या नादात आपण पहिल्यांदा या सुखद प्रवासाच्या सुंदर रस्त्याकडे पाहू लागतो. आणि पुढचे स्वाभाविक पाउल म्हणजे झोपेची चाहूल.तुम्ही म्हणाल काय बोअर मारतेय. इथेच तर गोष्ट सुरु होते. :-)हो सारे लेखक असेच सांगतात.
तर इथे सुरु होते आपल्या मार्गदर्शकाची भूमिका. मागच्या मंडळींनी गुंडाळी केल्यावर तो पण पाय ताणून देतो, हात सीटच्या वरून मागे टाकतो. दोन-चार वाक्ये बोलतो आणि गप्प बसतो.पुन्हा एकदा तो मैत्रि आणि झोपेच्या कात्रीत अडकलेला असतो.आजचा हा प्रताप त्या साठीच.३-४ तासांचा हा प्रवास न झोपता, बोलता-बोलता कसा करावा. गेले ते दिवस जेंव्हा तुम्ही प्रेमात तासंतास गप्पा मारायचा.आता कुठे उरला तो उत्साह.इथे अनेक एक्सपर्ट्स असतानाही मी नवशिक्याने लिहायची हिम्मत करावी हा उध्धट्पणा न समजता मूर्खपणा समजून माफ करावा.
चला तर मग, ट्रिप ला माझ्याबरोबर, मार्गदर्शक...द नेव्हिगेटर.(हिन्दी सिनेमाचा परिणाम :-) )
१. पहीली गोष्ट, गाणी :मागच्या लोकांनी 'इन डिमांड' म्हणून लावलेली गाणी तुम्हाला आणि चालकाला नको असली तर लगेच बदला. :-) आणि चालकाला हवी तर मध्यरात्री पण 'गायत्री मंत्र', जगजीत सिंग हवा तर लावून टाका.तुम्ही एकदम लेटेस्ट गाण्यांची सीडी नाहीतर 'एव्हरग्रीन' गाणी ऐकवून चालकास 'चकीत' करा. @-@
२.दर २०-२५ मिनिटांनी गाडीचा वेग, वेग-मर्यादा आणि अजून किती अंतर राहीले आहे याचे गणित पुन्ह: पुन्हा करून त्याबद्द्ल माहिती द्या. इथॆ गॅस म्हणजे इंधनाचे दर बदलत राह्तात( चक्क कमी पण होतात). त्यामुळे गॅस किती महागला, कुठ्ली गाडी किती इंधन पिते असा जिव्हाळ्याचा विषय बोलूनच घ्या. एकदा मी असेच म्हणाले की मला विमानतळावर गाडी घेउन जायचे आहे तर मला १० लोकानी १० रस्ते सांगितले. तेही मी 'मॅपक्वेस्ट' च्या साईट वर पाहाणार हे माहीत असूनही. तसेच तुम्ही पण एखादा कसा जवळचा (शौर्ट कट) होता पण मग टोल कसा आणि ट्रॅफिक किती हे बोलून घ्या.

३. इथे रस्त्याच्या आजू-बाजूला ना घरे दिसतात ना लोक न होटेल. साधे गाय, म्हॆस,कुत्रे,मांजरे(गाडीमध्ये बसलेली सोडून),चिमणी पण दिसत नाहीत.फक्त गाड्या, पुढे-मागे,सगळीकडे. वाटतं एखाद्या संगणकीय खेळामधेच आहोत.आपल्यामागून पुढे जाण्यार्या प्रत्येक गाडीबद्दल कॉमेंट मारून टाका. त्याला अडवता येत असेल तर उत्तमच, नाहीतर पुढे गेल्यावर पोलिसांनी पकडले म्हणजे कळेल असे म्हणणे आवश्यक आहे. गाड्यांची मॉडेल्स तर बोलूच नका.मर्सिडीज ना, काय सही आहे रे, इंटिरिअर, वाह ! आणि मघाशी गेली ती 'ऑडी' पाहिलीस का? २००६ चे मॉडेल आहे. हो यामध्ये आणि २००५ च्या मधे हेडलाईट वेगळे आहेत. आता तुमचे हेडलाईट विझत असेना का?
आपल्या टोयोटा, होंडा किंवा निसान मधे बसून बीएमडब्ल्यू,लिंकन आणि मर्स चे कौतुक करावे तेवढे थोडेच.मग जॅपनीज आणि अमेरिकन गाड्या हा तर ओळ्खीचा विषय. तुमची ३०-४५ मिनिटे तरि सरली नाही यात तर पॆज आपली !
४.आता म्हणाल दोन अडिच तास अजून आहेतच. एकदा मागे वळून झोपेलेल्या लोकांकडे पण नजर टाकून घ्या.आता खरी परीक्शा आहे.आई,बाबा,भाऊ,बहीण, टीव्ही सिरियल्स, आपला ऑनसाईट मॅनेजर,त्याची मीटिंग मधली गम्मत,इंडिया मधल्या नवीन घडामोडी,डील्स टु बाय वरच्या नव्या डील्स, व्हेकेशन प्लॅन्स,मुन्नाभाई, शाहरूख खान, आबु सालेम, आणि जो तोंडाला येईल तो विषय काढा. आता मात्र हद्द झाली आहे.सर्व सहनशक्ती संपलेली आहे.झोप अनावर झालीय आणि गाडी पण. गाडी एक्झिट ला थांबवून मस्तपॆकी कॉफी प्या. मागच्यांना जोरात हाक मारून उठवा :-) आणि जोरदार ताणून द्या. :-).........
सकाळी ६ वाजता, हलक्याश्या थंडीत, वळणदार रस्त्यांमधून वाट काढ्त,लॉस एंजलिस सारख्या सुंदर शहरात, हिरव्यागार झाडीतुन येणारया कोवळ्या किरणांमधून, अर्धवट डोळे उघडून पहा किती छान वाटतं ते. तुमचा सुखद प्रवास संपलाय,नाही हो, जरासा थांबलाय...घरी परत जाईपर्यंत. :-)) एन्जॉय !!!
- अनामिका