व्यंजनसंधी

व्यंजनसंधी: 

व्यंजनसंधीचे काही नियम पुढीलप्रमाणे


पहिल्या पाच वर्गांपैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातले पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. 

पोटशब्द
एकत्र येणारी व्यंजने व संधी
जोडशब्द

विपद्+काल द्+क्=त्+क्=त्क् विपत्काल

वाग्+ पति
ग्+प्=क्+प्=क्प् वाक्पति

वाग्+ ताडन
ग्+त्=क+त्= क्त्
वाक्ताडन

षड्+ शास्त्र
ड्+श्=ट्+ श्=ट्श्
षट्शास्त्र

क्षुध्+ पिपासा ध्+प्=त्+प्=त्प् क्षुत्पिपासा

पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होतो.

पोटशब्द
एकत्र येणारी व्यंजने व संधी
जोडशब्द

वाक्+विहार
क्+व्=ग्+व्+ग्व्
वाग्विहार

षट्+ रिपू
ट्+र्=ड्+र्=ड्र
षड्रिपू

अप्+ज
प्+ज्=ब्+ज्= ब्ज
अब्ज

पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्यात वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होतो. 

पोटशब्द
एकत्र येणारी व्यंजने व संधी
जोडशब्द

वाक्+निश्चय
क्+न्=ड्.+न्
वाङ्निश्चय

षट्+मास
ट्+म्=ण्+म्
षण्मास

जगत्+नाथ
त्+न्=न्+न्
जगन्नाथ

त् या व्यंजनापुढे


  • च्, छ् आल्यास त् बद्दल च् होतो.
  • ज्, झ् आल्यास त् बद्दल ज् होतो.
  • ट्, ठ् आल्यास त् बद्दल ट् होतो.
  • ल् आल्यास त् बद्दल ल् होतो.
  • श् आल्यास त् बद्दल च् होतो व पुढील श् बद्दल छ् होतो.

पोटशब्द
  एकत्र येणारी व्यंजने व संधी
जोडशब्द

सत्+चरित्र
त्+च्=च्+च् सच्चरित्र

सत्+ जन त्+ज्= ज्+ज्
सज्जन

उत्+लंघन त्+ल्=ल्+ल्
उल्लंघन

उत्+ छेद त्+छ्=च्+छ् उच्छेद

म् पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील 'म्' मध्ये मिसळून जातो. व्यंजन आल्यास 'म्' बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो.

 


पोटशब्द संधी जोडशब्द

सम्+ आचार म्+आ समाचार

सम्+गती म्+ग् संगती

 

६.

छ् पूर्वी ऱ्हस्व स्वर आला तर त्या दोहोंमध्ये च् हा वर्ण येतो.

पोटशब्द संधी जोडशब्द

रत्न+ छाया न्+ छ् रत्नच्छाया

शब्द+ छल द्+छ् शब्दच्छल

*नियम समजावा म्हणून काही उदाहरणे दिली आहेत , कित्येक शब्दांचा प्रत्यक्ष लेखनात खूप कमी वापर होतो.
*ह्या नियमांचे संकलन सुगम मराठी व्याकरण लेखन (कै. मो.रा.वाळंबे) व  शुद्धलेखन तुमच्या खिशात  (अरुण फडके) या पुस्तकांच्या आधारे केले आहे.