संधी - स्वरसंधी

संधी :
आपण बोलताना अनेक शद्ब एकापुढे एक असे उच्चारतो. त्यावेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांत मिसळतात. त्यांचा जोडशब्द तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होणाच्या प्रकारास संधी असे म्हणतात.
स्वरसंधी:
हे एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर *स्वर असतील तर त्याला स्वरसंधी म्हणतात.
स्वरसंधीचे काही नियम पुढीलप्रमाणे














































































































































































दोन सजातीय स्वर एकमेकापुढे आले तर त्या दोघांबद्दल त्याच जातीचा दीर्घ स्वर येतो.

पोटशब्द
एकत्र येणारे स्वर व संधी
जोडशब्द

सूर्य+अस्त
अ+अ=आ
सूर्यास्त

देव+आलय
अ+आ=आ
देवालय

मही+ईश
ई+ई=ई
महीश

विद्या + अर्थी
आ+अ=आ
विद्यार्थी

महिला + आश्रम
आ+आ=आ
महिलाश्रम

मुनि+ इच्छा इ+इ=ई
मुनीच्छा

गिरि+ईश
इ+ई=ई
गिरीश

गुरु+ उपदेश
उ+उ=ऊ
गुरूपदेश

भू+ उद्धार उ+ऊ=ऊ
भूद्धार

अ किंवा आ पुढे इ किंवा ई हा स्वर आल्यास त्या दोहोंऐवजी 'ए'येतो , उ किंवा ऊ आल्यास 'ओ' येतो, व 'ऋ' आल्यास 'अर्' येतो.

पोटशब्द
एकत्र येणारे स्वर व संधी
जोडशब्द

ईश्वर+इच्छा
अ+इ=ए
ईश्वरेच्छा

चंद्र+उदय
अ+उ=ओ
चंद्रोदय

महा+ऋषी
आ+ऋ=अर्
महर्षी

अ किंवा आ यांच्यापुढे 'ए' किंवा 'ऐ' हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल 'ऐ' येतो आणि ओ किंवा औ हे स्वर आल्यास त्याबद्दल 'औ' येतो.

पोटशब्द
एकत्र येणारे स्वर व संधी
जोडशब्द

मत+ऐक्य
अ+ऐ=ऐ
मतैक्य

सदा+एव
आ+ए=ऐ
सदैव

जल+ओघ
अ+ओ=औ
जलौघ

गंगा+ओघ
आ+ओ=औ
गंगौघ

वृक्ष+औदार्य
अ+औ=औ
वृक्षौदार्य

इ, उ, ऋ (ऱ्हस्व किंवा दीर्घ)यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास इ-ई बद्दल य्, उ-ऊ बद्दल व् आणि ऋ बद्दल र् हे वर्ण येतात आणि त्यात पुढील स्वर मिळून संधी होतो.

पोटशब्द
एकत्र येणारे स्वर व संधी
जोडशब्द

प्रीति+अर्थ
इ+अ=य्+अ=य
प्रीत्यर्थ

इति+आदी
इ+आ+य्+आ=या
इत्यादी

अति+उत्तम
इ+उ=य्+उ=यु
अत्युत्तम

मनु+अंतर
उ+अ=व्+अ=व
मन्वंतर

पितृ+आज्ञा
ऋ+आ=र्+आ=आ
पित्राज्ञा
ए, ऐ, ओ, औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय्, आय्, अव्, आव् असे आदेश होऊन पुढील स्वरात मिसळतात.

पोटशब्द एकत्र येणारे स्वर व संधी जोडशब्द

ने+अन ए+अ= अय्+ अ= अय नयन

गै + अन ऐ+ अ=आय्+अ= आय गायन

गो+ ईश्वर ओ+ई=अव्+ई=अवी गवीश्वर

नौ+ इक औ+इ=आव्+इ= आवि नाविक

* अ, आ, इ, ई , उ , ऊ , ए , ऐ, ऋ, लृ ,ओ,औ हे स्वर आहेत.


 स्वरसंधीचे काही जे नियम विसरले असतील तर ते सांगावे. मनोगतावर व्याकरणविषयक संकलन करण्यास हातभार लावावा ही विनंती. यापुढील भागात आपण व्यंजनसंधीचे नियम व उदाहरणे पाहू.