विसर्गसंधी

विसर्गसंधी: 

विसर्गसंधीचे नियम पुढीलप्रमाणे








































































































विसर्गाच्या मागे 'अ' हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा 'उ' होतो. व तो मागील 'अ' मधे मिसळून त्याचा 'ओ' होतो.

पोटशब्द
 संधी
जोडशब्द

यशः + धन यश+उ+धन यशोधन

मनः +रथ
मन+ उ+ रथ मनोरथ

तेजः+ निधी तेज+ उ+ निधी तेजोनिधी

अधः+ वदन
अध+ उ+ वदन
अधोवदन

विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क्, ख्,प्, फ् ह्यापैकी एखादे व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो मात्र पुढे अन्य स्वर आला तर विसर्ग लोप पावतो.

पोटशब्द
जोडशब्द

प्रातः+काल
प्रातःकाल

इतः+ उत्तर
इत उत्तर

तेजः+ पुंज
तेजः पुंज

 पदाच्या शेवटी स् येऊन त्याच्यापुढे कोणतेही व्यंजन आल्यास स् चा विसर्ग होतो.

पोटशब्द
जोडशब्द

मनस्+ पटल
मनः पटल

तेजस्+ कण
तेजःकण


 विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या 'र्' च्या मागे 'अ' व पुढे मृदू वर्ण आल्यास तो 'र' तसाच राहून संधी होतो.


पोटशब्द
जोडशब्द

पुनर् + जन्म
पुनर्जन्म

अंतर्+ आत्मा अंतरात्मा

विसर्गाच्या मागे इ किंवा उ असून पुढे क्, ख्, प्, फ् यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा ष होतो.


पोटशब्द जोडशब्द

निः+ कारण निष्कारण

निः+पाप निष्पाप

दुः+परिणाम दुष्परिणाम

दुः+ कृत्य दुष्कृत्य


















७. . 

विसर्गाच्या पुढे श्, स् आल्यास विसर्ग विकल्पाने काय्म राह्तो किंवा लोप पावतो

पोटशब्द  जोडशब्द

दुः+ शासन दुः शासन

निः+ संदेह निस्संदेह






















८.

विसर्गाच्या मागे अ, आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदु वर्ण आल्यास विसर्गाचा 'र' होऊन संधी होतो.

पोटशब्द जोडशब्द

निः+ अंतर निरंतर

दुः+ जन दुर्जन

बहिः+अंग बहिरंग

 ९. पदाच्या शेवटी 'र्' येऊन त्यापुढे कठोर व्यंजन आल्यास त्या र् चा विसर्ग होतो.


पोटशब्द         जोडशब्द
अंतर् + करण = अंतःकरण
चतुर् + सूत्री = चतुः सूत्री


 


*नियम समजावा म्हणून काही उदाहरणे दिली आहेत , कित्येक शब्दांचा प्रत्यक्ष लेखनात खूप कमी वापर होतो.
*ह्या नियमांचे संकलन सुगम मराठी व्याकरण लेखन (कै. मो.रा.वाळंबे) व  शुद्धलेखन तुमच्या खिशात  (अरुण फडके)