जय जवान, जय किसान!

मूर्ती लहान पण किर्ती महान अशा आपल्या लाल  बहादुर शास्त्री या माजी पंतप्रधानांची आज जयंती!


स्वत:चा कसलाही मोठेपणा न सांगता देशासाठी जे काही करता आले ते केले व जे करू शकलो नाही त्याची खंत उरात बाळगून हे जग सोडून गेले असे हे सामान्यातले असामान्य व्यक्तिमत्त्व!


काळाची गरज ओळखून ज्यांनी 'जय जवान, जय किसान' अशी सार्थ घोषणा लोकप्रिय केली त्या शास्त्रीजींना आज त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन