याहू ग्रुप्सचे काय करावे?

मनोगती मित्रांनो,


आपल्यापैकी बऱ्याच जणांस याहू ग्रुप्स बद्दल कल्पना असेल.मराठी कॅटेगरीचे ५००हून अधिक याहू ग्रुप आहेत."मराठी पीपल२" हा त्यातील प्रमुख आहे.माझाही १२०० पेक्षा अधिक सदस्यत्व असलेला देवनागरी  नावाचा याहू ग्रुप आहे पण तो विशेष कार्यरत होऊ शकला नाही.


मनोगत सारखे सबळ संकेत स्थळ मराठीत उपलब्ध झाल्यानंतर याहू ग्रुप्सचे काही प्रयोजन शिल्लक राहते का? असेल तर ते कोणते? त्यांची मनोगत सारख्या व्यासपीठाशी काही व्यावहारिक सांगड घालता येईल का किंवा कसे आणि दुसरा पर्याय म्हणजे हे ग्रुप कायमचे बंद करणे.


माझ्या मनात असे काही प्रश्न आहेत ज्याबद्दल सर्वांची मते जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.


विकिकर