धुळयातले चित्रपट

 धुळे हे उत्तर महाराट्रतिल एक शहर ज्याला खान्देश म्हनुनहि ओळखतात.


तर मी सांगणार आहे मी धुळे येथे पाहिलेल्या चित्रपटाविषयी .


तर धुळ्यात पहाटे सहा वाजतं नवा चित्रपट प्रदर्शित होत असे त्यासाटी आमचे काही होतकरू मित्र पहाटे पाच वाजेपसुन राग्नेत थांबतं असतं. अश्या पाहिल्या शोला मी नाना पाटेकरचा "क्रांतिवीर "बघीतलेला आठवतो. अन् हाहा सकाळच्या प्रासादिक वेळेत नानाचे ते डायलाग,त्यानेतर अनेक चित्रपट बघितले पण त्या शोची मजा काही औरच. ही अनुभवायची गोष्ट आहे मित्रानू.अश्याच पहाटेचा सत्रात "बौडर,तिरंगा ,असे चित्रपट पाहिल्याचे आठवतात.(यावरून माझी बायको{मूळ पुण्यातली } आमची कधीही टिंगल करते.


त्या वेळेस बाल्कनीचे तिकिटे विकल्या गेल्याशिवाय स्टालची तिकीट खिडकी उघडत नसे,मग सर्व गर्दी येकाच वेळेस सीटासाठी आक्रमणं करत असत. आमच्या कडे तिकीट नंबर नुसार बसण्याची सैकुचित प्रथा नाही! त्यामुळे जागेवरून झालेली धुमचक्रि अजून आठवते. आम्ही दोन खुच्यावर पाय ठेवेन जागा धरायचे.या अडचणीवर मात करून बरेच चित्रपट बघितलेले आठवतात.


त्या वेळेस चित्रपट- गृहात धौम्रपान करण्यास बंदी नव्हती.त्यामुले चित्रपटच्या अनेक रटाळ प्रसंगात धूम्रवलये प्रकाश झओतववरुन पारद्यावर उतरायची आणि तयला बाकीची जनता दाद द्यायची. अनेक चित्रपटाची समीक्षा तेथेच व्हायची त्यात खालून आलेले उस्पुर्थ सवाइद. "आईंना" नावच्या भीकारपटाची सांगल्यांत जास्त समीक्षा झालेली आठवते.   


वरील सर्व परिस्थिती बारा वर्षांपूर्वीची आहे. आता परिस्थिती बिघडली म्हणतात... म्हणजे आता लोक तिकीट नंबर नुसार बसतात, धौम्रपान करत नाहीत. चालायचाच कालाय.....


पण धुळ्यात जे चित्रपट बघितले तशी मजा नंतर वातानुकूलित बहु पडदा चित्रपट गृहामध्ये सुधा आली नाही.


वरील लेखात धुळ्याची टिंगल करायचा प्रयत्न नाही,नाहीतर एखादा मनोगती धुळेकर 'रिक्शा भरून आनयचा'(रिक्शा भरून आणणे= रिक्शा भरून मारायला लोक आणणे).


बघूया  या लेखानंतर धुळ्याचे पर्यटन वाढते का?   


प्रफुल्ल,


एक धुळेकर.