लहांन मुलांसाठी मटकीचे समोसे

  • एक वाटी तय्यार केलेली मटकीची सुकी भाजी
  • मळलेले कणीक
१५ मिनिटे
दोघांसाठी

एक पातळ मोठी पोळी करा, अडिच ते तीन इंचाच्या पट्ट्या कापा. एक एक पट्टीचे समोस्या सारखे कोन करा. त्या कोनात मटकीची सुकी भाजी भरा व त्याचा उरलेला कोपरा कोनाच्या आत दूमडुन बंद करा. नंतर डोस्याच्या तव्यावर ते समॉसे ठेवुन तेला मध्ये चांगले करकरीत शेकवून घ्या.
आता हे तयार समोसे मुलांना सॉस सोबत खायला द्या. मूले हे समोसे टिफ़िनमधे सुद्धा अत्यंत आवडीने खातात.

नाहीत.

आमच्या रेगे काकू