अंतर्नाद - दिवाळी २००६

मराठी साहित्यात स्वतःचे एक ठळक स्थान तयार केलेल्या 'अंतर्नाद' या मासिकाने या वर्षीचा दिवाळी अंक मराठी साहित्यविश्वातल्या वीस श्रेष्ठ पुस्तकांना वाहिला आहे. या पुस्तकांची निवड सर्वस्वी वाचकांच्या प्रतिसादांवर आधारित आहे. 'अंतर्नाद' च्या या दिवाळी अंकात अशा वीस पुस्तकांचा अल्प परिचय, त्याचा सविस्तर आस्वाद आणि आस्वादकर्त्याचा परिचय (मूळ लेखकाच्या रेखाचित्रासह )  दिलेला आहे.
ही वीस पुस्तके अशी :
१. शामची आई २.रणांगण ३.बनगरवाडी ४.ययाति ५.कोसला ६. चिमणरावांचे चऱ्हाट ७. कळ्यांचे नि:श्वास ८. तलावातले चांदणे ९. काजळमाया १०. सखाराम बाईंडर ११. संपूर्ण केशवसुत १२.विशाखा १३.मर्ढेकरांची कविता १४.मृदगंध
१५. युगांत १६. स्मृति-चित्रे १७.बलुतं १८.आहे मनोहर तरी... १९. व्यक्ती आणि वल्ली २०. माणसं!


ही यादी परीपूर्ण असल्याचा 'अंतर्नाद' चा दावा नाही. एका लेखकाचे/लेखिकेचे एकच पुस्तक निवडायचे हा आणि असे अनेक नियम पाळून तयार झालेली ही यादी आहे.
मराठी माणसाने किमान ही वीस पुस्तके तरी वाचलीच पाहिजेत, असे काहीसे 'अंतर्नाद' ला सुचवायचे असावे.
मी यातील अकरा पुस्तके वाचलेली आहेत. म्हणजे 'अंतर्नाद' च्या चाचणीत मी काठावर पास झालो आहे.
या यादीविषयी तुम्हाला काय वाटते? मराठी साहित्याचे (तुट्पुंजे का होईना) प्रतिनिधित्व ही यादी करते असे तुम्हाला वाटते का? पुस्तके खरेदीचे संपूर्ण स्वातंत्र्य असेल तर यातील कोणती पुस्तके तुम्ही खरेदी कराल?