...म्हणायचे-२

आमची प्रेरणा - सारंग ह्यांची गझल बरेच झाले.

वयात आली म्हणायचे
हसून सारे पहायचे

बघून गेले भले-भले
पसंत कोणी न यायचे

नको उगा ह्या खुणा-शिट्या
उगी कुणाला कळायचे

उरीच राही उरातले
पदर जरी फडफडायचे

कवी नसे मी, कळे मला
दळण तरीही दळायचे

कडेकडेने लपतछपत
इथून आता टळायचे

मणामणाचे तिचे वजन
न खोडसाळा उठायचे